मराठा क्रांती मोर्चाचे ६ ऑक्टोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवास्थान ‘मातोश्री’ बाहेर आंदोलन

मुंबई : राज्यभरात मराठा सामाजाचा (Maratha community) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजातील तरुणांना नोकरी आणि शिक्षण याबाबतचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा स्पर्धा परीक्षा केंद्र व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर ६ ऑक्टोबरला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने येथे देण्यात आला.

मराठा आरक्षणाला स्थगितीनंतर स्पर्धा परीक्षेचा घाट घातला गेला आहे. यामागे कोणते अधिकारी आहेत, त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडून आता जनतेशी संवाद साधला पाहिजे. त्यांनी मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास मातोश्रीसमोर आंदोलन करण्यात येईल.

मराठा समाजातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न सतावत आहे. लवकरच राज्य महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणार आहे. या परीक्षेसाठी मराठा समाजाच्या नेमक्‍या कोणत्या प्रवर्गातून परीक्षेला बसणार याबाबतची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे राज्य शासनाने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केल्यास परीक्षा केंद्र फोडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शासनाने आधी आरक्षणाच्या बाबतची भूमिका स्पष्ट करावी मगच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी आबा पाटील यांनी केली,अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी दिली .

मराठा समाजातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न सतावत आहे. लवकरच राज्य महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणार आहे. या परीक्षेसाठी मराठा समाजाच्या नेमक्‍या कोणत्या प्रवर्गातून परीक्षेला बसणार याबाबतची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे राज्य शासनाने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केल्यास परीक्षा केंद्र फोडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शासनाने आधी आरक्षणाच्या बाबतची भूमिका स्पष्ट करावी मगच परीक्षा घेण्यात याव्यात, असा मागण्याही त्यांनी केल्या.

नरेंद्र पाटील यांनी घेतली रहाडे कुटुंबीयांची भेट :

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यावर मराठा आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच या प्रश्नावर बीडमध्ये विवेक रहाडे नावाच्या एका तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवेक रहाडे असे त्या तरुणाचे नाव आहे . गुरुवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रहाडे कुटुंबीयांची भेट घेईन सांत्वन केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER