मराठा क्रांती मोर्चाचे आगळे-वेगळे आंदोलन ; मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले रक्ताने सह्या केलेले पत्र

CM Thackeray-Maratha Reservation

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Marathi Reservation) वातावरण चांगलेच पेटले आहे. आतापर्यंत तीव्र आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आणखी कठोर पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या सह्याचं पत्र लिहिण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत.

माहितीनुसार, मराठा क्रांती मोर्चातील (Marathi Kranti Morcha) कार्यकर्त्यांनी पत्र लिहून त्यावर प्रत्येकाने आपल्या रक्ताने सह्या केल्या आहेत. रक्ताच्या साह्य करून हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे (CM Thackeray) पाठवण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील समन्वयकांनी हे पत्र लिहलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणावरून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. अशात, खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले (Sambhaji Raje Bhosle) यांना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाही”, असा टोला लगावला होता, त्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रत्युत्तर देत माफीची मागणी करण्यात आली आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER