मराठा क्रांती मोर्चा पुन्हा पेटून उठला; आरक्षणासाठी मुंबईत ठिय्या आंदोलन

मराठा क्रांती मोर्चा

मुंबई :- सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मराठा आरक्षणास (Maratha Reservation) स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज (Maratha Community) पुन्हा पेटून उठला आहे. मराठा समाजाने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आज मुंबईत ठिकठिकाणी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घेत हे आंदोलन करण्यात येत आहे.

कुर्ला, वडाळा, चेंबूर, मानखुर्द, वरळी, वांद्रे, बोरिवली, कांदिवली, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे हीच एक मागणी घेऊन आज आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

दरम्यान आंदोलकांनी हिंसक होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER