मराठा आंदोलनाला आक्रमक सुरुवात ; दानवेंच्या घरासमोर ढोल बजाव, तर टोपेंना घेराव घालण्याचा प्रयत्न

maratha-reservation

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं (SC) स्थगिती दिली आहे. यावरून मराठा समाजामध्ये संतापाची लाट आहे . यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चा (Maratha-kranti-morcha)आंदोलन करणार आहे. कोल्हापुरात मराठा आंदोलक मुंबई आणि पुण्याला येणारा दूध पुरवठा रोखणार आहेत, तर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्या-मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा आंदोलक रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चा आज ढोल बजाव आंदोलन करणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि ठाकरे सरकारमधील (Thackeray Govt) शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER