मराठा समाज एमपीएससी परीक्षांवरून आक्रमक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम

maratha-kranti-morcha-letter-to-cm-uddhav-thackeray-to-cancel-mpsc-exam

मुंबई : राज्यात कोरोना संकटाच्या (Corona Crises) पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षां (mpsc-exam) पुढे ढकलण्यात आल्या होत्या . आता पुन्हा परीक्षा लांबणीवर जाण्याची चिन्हे आहे . कारण जर परीक्षा पुढे ढकलली नाहीतर राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. 11ऑक्टोबरला राज्यसेवेची पुर्वपरीक्षा होणार आहे. पण त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत ठाम भूमिका मांडली.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र :

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यामुळे परीक्षेची तयारी करणारे राज्यातले मराठी समाजाचे विद्यार्थी नाराज आहेत. त्यांना नेमक्या कुठल्या प्रवर्गात समावेश दिला जाणार आहे याबद्दल अद्याप कुठलीही माहिती नसल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावी असं पत्रात लिहिण्यात आलं आहे. जर परीक्षा रद्द झाली नाही तर मराठा समाज राज्यात उग्र आंदोलन करणार असा स्पष्ट इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

याआधी मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी आणि मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या 6 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

माहितीनुसार, परीक्षेसाठी अर्ज भरताना मराठा उमेदवारांनी एस.ई.बी.सी प्रवर्गातून अर्ज भरले होते. मात्र, आता आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नेमक्या कुठल्या प्रवर्गात मराठी विद्यार्थी मोडणार याची अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यासाठी सगळ्यात आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी आणि त्यांनतर परीक्षा घेण्यात याव्या असा सल्ला देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER