मराठा आरक्षणासाठी पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

Maratha Kranti Morcha

पुणे :- मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यलयाबाहेर मराठा मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तुपे यांनी पण आंदोलनात भाग घेतला. मराठ्यांना आरक्षण मिळावे ही आमच्या पक्षाचीही भूमिका आहे असे ते म्हणाले. त्यांनी निदर्शकांचे मागण्यांचे निवेदन तुपे यांनी स्वीकारले.

‘सारथी’च्या मागण्यांची अमलबजावणी करा, अशी मागणीही निदर्शकांनी केली. सरकार मराठा आरक्षण टिकावे यासाठी प्रामाणिकपणे काम करते असे, तुपे म्हणाले. भाजपा, शिवसेनेच्या पक्षांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. निदर्शकांनी मराठा आरक्षणाच्या समर्थानात घोषणा दिल्या.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : पुण्यातील बैठकीला साताऱ्याचे दोन्ही राजे राहणार उपस्थित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER