मुंबईत मराठा समाज आक्रमक ; प्लाझा थिएटरबाहेर ठिय्या आंदोलन

Maratha reservation

मुंबई :  मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मराठ समाज आक्रमक झाला असून  त्यांनी अनेक ठिकाणी ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Govt) आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आज मुंबईत मोर्चा वळवला आहे. मुंबईत दादर इथल्या प्लाझा थिएटरबाहेर (Plazma Theater) मराठा क्रांती मोर्च्यातर्फे आज ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

सकाळी ११ ते १ आंदोलन केलं जाणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईत आज २०-२५ ठिकाणी आंदोलन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्च्याने रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारले आहे.क करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER