मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; पंढरपुरात निर्देशने; केंद्राविरोधात घोषणाबाजी

Maratha Kranti Morcha aggressive in Pandharpur

पंढरपूर : मराठा समाज (Maratha Community) गेली ३२ वर्षे आरक्षणासाठी झगडत आहे. मराठा तरुणांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आता मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत. तसेच बेरोजगारीचेही प्रमाण वाढणार आहे. हा दिवस मराठा समाजाच्या प्रत्येक माणसासाठी काळा दिवस आहे. राज्य आणि केंद्र सरकारने तरुणांचा अजिबात विचार केला नाही. सरकारने मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करू नये. अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला धक्का बसला आहे.

त्यानंतर आता मराठा समाजातील विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज पंढरपूर येथे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी फलकाचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा राज्य आणि केंद्र सरकार विरोधात एल्गार पुरकारला आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकार विरोधात निदर्शने करत आक्षरण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. येत्या २० सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने आरक्षण प्रश्नी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासाठी सरकारने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामांकित कायदे तज्ज्ञांची फौज उभी करावी. अन्यथा सरका विरोधात राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आकाश पवार, संदीप मुटकुळे, शहाजी शिंदे, गणेश चव्हाण, नीलेश गंगथडे, बापू चौधरी आदींसह मराठा समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button