मराठा क्रांती मशाल मोर्चा : मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय आंदोलन मागे घेणार नाही

- विश्वास नांगरे पाटील व विनायक मेटेंमध्ये चर्चा

Maratha Kranti Mashal Morcha

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थळी मोर्चा निघणार होता. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा वांद्रे पूर्व भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सध्या थांबला आहे. निदर्शकांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे म्हटले आहे.

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत व त्यांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. एक मराठा लाख मराठा म्हणत आज मराठा क्रांती मोर्चाने वांद्रे पूर्व भागात मशाल मोर्चा काढला होता. हा मशाल मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवास्थान मातोश्रीवर जाणार होता.

विश्वास नांगरे पाटील (Nangre Patil) आंदोलनस्थळी दाखल झाले असून मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या निर्णयावर मराठा आंदोलक ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाबरोबरच (Corona) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विश्वास नांगरे पाटील आंदोलनस्थळी आले असून ते आंदोलन थांबवण्याची विनंती करीत आहेत. मात्र सरकारचा प्रतिनिधी आल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नसल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : राज्य सरकारने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER