मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च ‘मातोश्री’वर धडकणार

Maratha reservation

मुंबई :- मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) मशाल मार्च आज सायंकाळी 5 वजात मातोश्रीवर धडकणार आहे.

मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रिम केर्टात ते टिकावं, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचं आयोजन केलं आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्स आदिची व्यवस्था करण्यात आली आहे

सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकर्त्यांच्या वतीने मातोश्रीवर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER