मराठा समाजाने तात्पुरते EWSचा लाभ घ्यावा : नवाब मलिकांचे वक्तव्य

Nawab Malik

मुंबई :- मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (EWS) विद्यमान आरक्षणाचा लाभ घ्यावा. राज्यातील मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांना EWS चा लाभ घेता येईल. तात्पुरत्या काळासाठी मराठा समाजाने या सवलतीचा फायदा घ्यावा, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले.

आरक्षणाचा लाभ कोणत्याही वर्गाला मिळत नाही, त्या समाजाला EWS मध्ये लाभ मिळणार आहे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या याचा फायदा होणार आहे. मराठा समाजाला दिलेले विशेष आरक्षण कोर्टाने रद्द केले आहे आणि आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे गरीब मराठा वर्गाला या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने हा आदेश निर्गमित केला आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाच्या (Maratha Community) संघटनांचे नेते आक्रमक झाले होते. काही संघटनांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत EWSमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. मागणीनुसार, राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या समाजाचे नेतृत्व करणारे मंडळी सरकारच्या या निर्णयावर काय भूमिका घेतात, हे पाहाणे महत्त्वाचे आहे.

ही बातमी पण वाचा : ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार लवकरच तोडगा काढेल – नवाब मलिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button