मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको : खासदार संभाजीराजे

Sambhaji Raje

नाशिक :- राज्यात ओबीसी समाजामध्ये (OBC Community) मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असली, तरी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, ही पहिल्यापासूनची भूमिका असल्याचे खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी काल, पत्रकारांशी बोलताना सांगितले.

औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आमचा याला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यानी स्पष्ट केले.

मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे मागासवर्गीय आयोगाने सिद्ध केले आहे. यामुळे आर्थिक आधारावरील आरक्षण घेताना सामाजिक मागासलेपणाच्या आरक्षणावर त्याचा परिणाम होणार नाही, याची हमी शासनाने देण्याची गरज आहे. याबाबत राज्य सरकारने पुढे येऊन मराठा समाजाच्या मनातील शंकांचे निरसन करून स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचेही संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या हकालपट्टीने काहीही साध्य होणार नाही. त्याऐवजी त्यांच्या अनुभवाचा मराठा आरक्षणासाठी फायदा घ्यावा, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी १०० किल्ल्यांना भेटी देण्याचा मानस : खा. संभाजीराजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER