आरक्षणविरोधी संस्था व व्यक्ती ‘भाजप-RSS’शी संबंधित, मराठा समाजाशी दगाबाजी; काँग्रेसचा आरोप

Sachin Sawant

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द ठरवल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे, आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. खरं तर मराठा आरक्षणाला पाठिंबा हा भाजपाचा (BJP) दिखावा आहे. प्रत्यक्षात आरएसएसच्या विचारधारेप्रमाणेच भाजपची मानसिकता आरक्षणविरोधी आहे. आरक्षणाबाबत न्यायालयीन विरोध करणारी ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ (Save Merit Save Nation) ही संस्था व त्याचे पदाधिकारी भाजप आणि आरएसएसशी (RSS) संबंधित आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.

या संस्थेचे थेट नागपूर आरएसएसशी कनेक्शन आहे. भाजपच्या कार्यातही या लोकांचा पुढाकार असल्याचे पुरावे समोर आले आहेत. CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी भाजपच्या व्यासपीठावर होती. “‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संस्थेचे संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भातील समन्वयक आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली आहे, या सगळ्यांनी मराठा आरक्षण विरोधात मोर्चा काढला होता.” असे सावंत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीच त्यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. मुंबई हायकोर्टात आरक्षणाची लढाई सुरू असताना ही संस्था अस्तित्वात नव्हती. परंतु हायकोर्टात आरक्षणाच्या बाजूने निकाल लागताच या संस्थेचे कामकाज सुरू झाले. मराठा आरक्षणविरोधात रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली का? याबाबत दोघांनीही स्पष्टीकरण द्यावे, भाजपचा हेतू यातून समोर आला आहे, असेही सावंत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button