शिवसेना आमदाराच्या घरातच मराठा आंदोलकांचे ठिय्या आंदोलन

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha-community) मुद्दा चांगलाच तापला आहे . यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी आज कल्याण पश्चिमेकडील शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांच्या घरी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. मात्र आमदार काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांची कार्यकर्त्यांशी भेट झाली नाही.

तेव्हा आमदारांचे बंधू नगरसेवक प्रभूनाथ भोईर यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी आमदारांचा मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यात आल्याचे पत्र दिले गेले .

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण टिकले होते. मात्र विद्यमान सरकारला ते आरक्षण टिकवता आलेलं नाही, अशी टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली. महाविकासआघाडीचे सरकार मराठा समाजाच्या बरोबरीने काम करण्यास तयार नाही. त्यामुळे मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही, असेही गणपत गायकवाड म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER