जुन्या बुलेटपासून बनवले दिड लाखांचं ट्रॅक्टर, शेतकऱ्याच्या कल्पकतेला सलाम !

महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातील निलंगातील रहिवासी असणारे शेतकरी २०१५पासून दुष्काळाचा सामना करतायेत. याच शेतकऱ्यांपैकी एक असणाऱ्या मकबुल शेख (Maqbool Sheikh) ज्यांची तीन एकर शेती या भागात आहे. ४३वर्षीय मकबूल यांनी पाण्याची टंचाई लक्षात घेवून बैल विकले. यानंतर शेती कामात त्यांना प्रचंड अडचणी येवू लागल्या. शेती अजून कठीण होवून बसली. मकबुल यांनी प्राप्त परिस्थीतीत संधी शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांनी शोधून काढलेला मार्ग न फक्त त्यांच्या तर शेकडो शेतकऱ्यांच्या कामाचा ठरलाय. त्यांनी जुन्या बुलेटपासून टॅक्टर बनवलाय ज्याची किंमत बाजारात मिळणाऱ्या ट्रॅक्टरपेक्षा (tractor) दहापट कमीये.

त्यांचा प्रयोग इतका यशस्वी झाला की त्यांच्या भागातील १४० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून हा ट्रॅक्टर खरेदी केलाय. त्यांच्या या शोधासाठी त्यांना सरकारकडून सन्मान आणि शाबासकी ही मिळालीये.

बुलेट बदलली ट्रॅक्टरमध्ये

त्यांना या अविष्काराची प्रेरणा त्यांच्या भावापासून मिळाली. ‘एग्रो वन ट्रेलर्स अँड मंसूरभाई ट्रॅक्टर्स’या भावाच्या वर्कशॉपमध्ये काम करुन त्यांना ही प्रेरणा मिळाली. लहानपणापासून ते त्यांचे मोठे भाऊ मंसूर यांच्या सोबत मिळून मॅकेनिकचे काम करायचे. ट्रॅक्टरबद्दल सर्व माहिती त्यांच्याजवळ होती. काही वर्षापूर्वी मंसूर यांच्या मृत्यू झाला. यानंतर शेती आणि वर्कशॉप दोन्हीची जबाबदारी मकबूल यांच्यावर आली.

त्यांनी ट्रॅक्टरची या मॉडेलवर २०१६पासून काम करायला सुरुवात केली. आधी ट्रॅक्टर बनवताना जुन्या साहित्यांचा वापर करायचे. त्यांनी असा ट्रॅक्टर बनवला जो आकाराने लहान पण खेतीसाठी चांगला असेल.भावाच्या वर्कशॉपवर असणारा कामाचा अनूभव गाठी होता. ट्रॅक्टर कसा बनवायचा या संबंधी सर्व माहिती त्याच्या जवळ होती. त्यांनी तीन चाकी १० एचपी ताकद असणारा ट्रॅक्टर बनवण्याच ठरवलं आणि यासाठी बुलेटचा वापर त्यांनी केला.

ट्रॅक्टरला अंतिम स्वरुप द्यायला त्यांना दोन वर्ष लागली. या ट्रॅक्टरवरती त्यांनी १०० पेक्षा जास्तवेळा वेगवेगळे प्रयोग केले होते. अनेकदा ट्रॅक्टरचे सर्व घटक एकाच वेळी काम करायचे नाहीत. यासोबत कमी इंधनात काम करेल असं ट्रॅक्टर त्यांना बनवायचे होते. हे त्यांच्यासाठी आव्हानाचे काम होते. शेतीत या ट्रॅक्टरच परिक्षण करण्यात आलं. सर्व मापदंडांवर टिकेल असं ट्रॅक्टर बनवल्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक पाच ट्रॅक्टर्स पहिल्यांदा बनवले आणि शेतकऱ्यांना ट्रायलसाठी दिले. त्यांनतर मिळालेल्या सल्ल्यातून, शेतकऱ्यांना आलेल्या अनूभवातून त्यांनी २०१८ला ट्रॅक्टर बनवला.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मकबूल यांचे हे ट्रॅक्टर पहायला आणि खरेदी करायला दुरवरुन लोक एकत्र येवू लागले. आता त्यांच हे ट्रॅक्टर एका आठवड्यात तयार होवून वापरायला मिळतं. बाजारात याच ताकदीच्या ट्रॅक्टरची किंमत १४लाख रुपये आहे पण प्रत्यक्षात तेच काम करणारं हे ट्रॅक्टर १ लाख ६०रुपयात तयार होवून मिळतं. शिवाय याहून छोट मॉडेल हवं असल्यास ते ६० हजार रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

ट्रॅक्टरचे आहेत अनेक फायदे

अनेक शेतकऱ्यांनी हा ट्रॅक्टर वापरायला सुरुवात केलीये. २० एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा बुलेट ट्रॅक्टर फायद्याच ठरतंय. उसाच्या शेतीपासून बागायतदारांपर्यंत सर्वांसाठी हे किफायती आणि इंधनाची बचत करणारे ट्रॅक्टर फायद्याचे असल्याचे सांगतात.

डिझेलची दुप्पट बचत या ट्रॅक्टरमुळं शक्य आहे. याचे पार्ट्स लहान असल्यामुळं काही दुरस्ती असल्यास ती जागच्या जागी करता येते. मजूरांसाठी लागणारा अफाट खर्च हे ट्रॅक्टर वाचवतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER