राम मंदिराचे नकाशे अयोध्या विकास प्राधिकरणाने केले मंजूर

Ram Mandir

आयोध्या : अयोध्या विकास प्राधिकरणाने राम मंदिराच्या नकाशांना मंजुरी दिली आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व आयुक्त एम.पी.अग्रवाल यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून दोन नकाशे देण्यात आले होते. त्या नकाशांना बैठकीदरम्यान मंजुरी देण्यात आली, असे ते म्हणाले.

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे दोन नकाशे देण्यात आले होते. त्यापैकी एक लेआऊट २ लाख ७४ हजार चौरस मीटरचा तर दुसरा मंदिराचा नकाशा होता  १२ हजार ८७९ चौरस मीटरचा. संचालक मंडळाच्या बैठकीत १४ सदस्य उपस्थित होते. या नकाशांना सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली, असे अग्रवाल यांनी सांगितले.

यावर लागू असलेल्या टॅक्सची माहिती घेणे सुरू आहे. टॅक्स जमा केल्यानंतर नकाशे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला सोपवण्यात येणार आहेत. मंदिराच्या नकाशाला मंजुरी मिळाली असून आता मंदिर उभारणीचे काम लवकरच सुरू करणार येईल, असे ट्रस्टने म्हटले आहे. राम मंदिराच्या पाच एकर क्षेत्रात असलेल्या जुन्या मंदिरांच्या साफसफाईचे काम आहे.

एल अँड टी कंपनीची मशीन त्या ठिकाणी पोहचली आहे. आणखी काही मशीन एक-दोन दिवसांत येतील. मंदिरासाठी स्तंभ उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे, असे मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्त यांनी सांगितले.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER