मनसेत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश, शिवसेना-काँग्रेसला धक्का

Many Workers in MNS

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) शिवसेनेच्या (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) प्रवेश केला. मनसेचे शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला.

नांदेड शहरातील प्रत्येक वार्डात मनसेचे कार्यकर्ते असावेत यासाठी नियोजन सुरू आहे. पक्षवाढीसाठी मनसेत युवकांना सामावून घेतले जात आहे, असे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी यांनी मनसेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी शिवडी आणि वरळीतील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER