
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझिम अकाळी पाऊस झाला. सकाळपासून मुंबईसह नवी मुंबई, वसई, पालघर, रायगड जिल्ह्यात पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण (cloudy weather) आहे. हवेतील गारवा वाढला आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागातही असेच वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे, तसे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. वसई विरारमधील शहरी तसेच ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे. अकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज सकाळपासून वसई तालुक्यात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या.
पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस आला. अलीबाग ते पोलादपूर या सर्वच तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला