धोनीच्या ब-याच टिप्स अपयशी ठरतात : कुलदीप

dhoni-kuldeep

मुंबई : महेंद्रसिंग धोनीला यष्टिमागून अनेकदा गोलंदाजांना मार्गदर्शन करताना बघितले असले तरी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने ख‍ळबळजनक दावा करताना म्हटले आहे. धोनीच्या ब-याच टिप्स चुकीच्या असतात. सीएट पुरस्कार वितरण सोहळ्यात कुलदीपला आउटस्टँडींग परफॉर्मन्स ऑफ द इयर या पुरस्काराने गोरवान्वित करण्यता आले. त्यावेळी त्याने हा दावा केला.

कुलदीप म्हणाला,” धोनी अनेकदा आम्हाला यष्टिमागून मार्गदर्शन करत असतो. षटकाच्या मध्येच तो आम्हाला टिप्स देतो. काहीवेळा त्याच्या टिप्स कामी येतात, परंतु अनेकदा त्या अपयशी ठरतात. पण अपयशी ठरल्या तरी आम्ही माहिला काहीच बोलू शकत नाही.

सीएट क्रिकेट रेटींग पुरस्कार पुढीलप्रमाणे-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व फलंदाज : विराट कोहली
आंतरराष्ट्रीय गोलंदाज : जसप्रीत बुमराह
आंतरराष्ट्रीय कसोटीपटू : चेतेश्वर पूजारा
आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटपटू : रोहित शर्मा
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळाडू : ॲरोन फिंच
उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू : कुलदीप यादव
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० गोलंदाज : रशीद खान
जीवनगौरव पुरस्कार : मोहिंदर अमरनाथ
राष्ट्रीय खेळाडू : आशुतोष अमन
आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू : स्मृती मानधना
कनिष्ठ गटातील खेळाडू : यशस्वी जैस्वाल