एक राजे तर दुसरे दिग्गज नेते पवारांच्या भेटीला; अनेकांच्या भुवया उंचावल्या

Many shocking at the meet of one king and another veteran leader to Pawar

सातारा :- कोल्हापूर, सातारा या दोन जिल्ह्यांचा कोरोनाच्या (Corona) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (रविवार) राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कऱ्हाड येथे दाखल झाले. त्यानंतर ते वाहनाने शासकीय विश्रामगृहात आले. त्यापूर्वी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosale) हे दाेघे एकाच गाडीतून आले. या दाेघांचे एकत्रित येणे चर्चेचा विषय ठरला. काही वेळानंतर पवार यांचे विश्रामगृहावर आमगन झाले. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवार यांची विशेष भेट घेऊन त्यांच्याशी १५ मिनिटे चर्चा केली.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील हेही उपस्थित हाेते. या बैठकीमधील तपशील समजू शकला नाही; मात्र उपस्थित राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये त्याची दबक्या आवाजात चर्चा रंगली. तर काहींच्या भुवया उंचावल्या. शिवेंद्रसिंहराजे यांनी पवार यांच्याशी सुमारे १५ मिनिटे विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण आदी उपस्थित हाेते. त्यानंतर उपस्थित सर्व नेते व लोकप्रतिनिधी टाऊन हाॅल येथील बैठकीच्या ठिकाणी रवाना झाले. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या बैठकीत आहे.

तुम्हाला नंतर फाेन करताे असे सांगितले. त्यामुळे दाेन्ही नेत्यांमधील झालेल्या चर्चेचा सूर समजू शकला नाही.तर दुसरीकडे, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शरद पवार यांची शनिवारी गोविंदबाग (बारामती) येथे भेट घेतली. या भेटीमुळे तालुक्‍यात राजकीय चर्चा रंगली आहे. माजी आमदार जगताप यांनी नेमकी ही भेट कशासाठी घेतली? जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत की काय? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा प्रचार केला होता. या वेळी त्यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. तर विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला होता.

त्यामुळे पवार-जगताप भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीनंतर जयवंतराव जगताप म्हणाले, शरद पवारांचे व माझे भावनिक नाते आहे. ते मला पितृतुल्य आहेत. त्यांची सदिच्छा भेट मी घेतली. नामदेवराव जगताप यांच्यापासून पवार यांचे व आमचे ऋणानुबंध आहेत. पवार यांच्याशी तालुक्‍यासह जिल्ह्याच्या राजकीय व विकासात्मक बाबींवर चर्चा झाली. भविष्यात कृतीतूनच याचे रिझल्ट दिसतील.

मधल्या काळात काही स्थानिक राजकीय मतभिन्नतेमुळे मी त्यांच्यापासून दूर असलो तरी भावनिक व वैचारिकदृष्ट्या आम्ही कधीच विभक्त झालो नव्हतो अथवा त्यांच्यावरील माझी श्रद्धा व त्यांचेदेखील माझ्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही वा होण्याचे काहीच कारण नाही. तालुक्‍याच्या विकासाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ठामपणे पाठीशी राहण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख ऐकून शरद पवारांचा संताप ;  संजय राऊतांनी दिली माहिती   

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER