शिवसेनेत अनेक पक्षांचे कार्यकर्ते दाखल : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : अनेक पक्षांचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत, तीन पक्ष एकत्र आहेत, त्यामुळं इनकमिंग एकाच पक्षातून होणार, महाराष्ट्राचे नेतृत्व तीन पक्षांच्या नेत्यांनी करायचे ठरवले आहे. आमचा एकही फुटणार नाही म्हणताहेत; पण थोडे दिवस थांबा, काय काय होते ते, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे .

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रासोबत देशाचे नेतृत्व करावे, अशी अनेकांची इच्छा आहे. शिवसेना (Shiv Sena) फक्त एक पक्ष नाही, सेना एक कुटुंब आहे. बाळासाहेबच आमचे कुटुंबप्रमुख आहेत, असेही राऊत म्हणाले. नाशिकच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. नाशिक कायम सेनेचा बालेकिल्ला आहे. आमचा एकही फुटणार नाही म्हणताहेत, पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल.

भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेना भवन असेल, गेले वर्षभर महाराष्ट्रात अनेक संकटे, उत्तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय कार्यकर्ते सेनेत प्रवेश करताहेत, ते कुठे होते हे आपण आता बोलायचं नाही, आज हे सभागृह भरलं असतं; पण कोरोनाच्या अडचणी आहेत. उद्योग आघाडी शिवसेनेसोबत आली असल्याचेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER