हाडांचे घनत्व तपासणी व वात रोग निदान शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ

Many of the benefits of bone density check and ventilation diagnosis camp

नागपूर : वाढत्या वयातील अस्थिघनता त[तपासणी (बोन डेन्सिटी) व वात रोग निदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन ऍड. माधवदास ममतानी यांच्या हस्ते झाले.

ही बातमी पण वाचा:- ‘विधी अधिकारी’ पद उपायुक्त पदाकरिता असलेल्या पदोन्नती साखळीमध्ये समाविष्ट करणार

डॉ. अंजू ममतानी म्हणाल्या, हाडांची कमजोरी (अस्थिघनता कमी होणे) वयाच्या 40 वर्षानंतर स्त्री व पुरुषात दोघांमध्ये येते. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये वाढत्या वयानुसार कॅल्शियमचे प्रमाण 30 से 60 टक्के पर्यंत कमी होत जाते. यामुळे भविष्यात फ्रैक्चर, संधिवात, कम्बर दुखी, गुडघ्यांचे दुखणे आदी वात रोग होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे पूर्वीच हाडांमधील कॅल्शियमची कमतरता (ऑपस्टियोपोरोसिस) असल्याचे माहित झाल्यास हाडांच्या आजारांपासून वाचता येणे शक्य होते. कॅल्शियम, विटामिन ‘डी’, ‘ई’, ‘सी’ च्या कमतरतेने हाडांमध्ये घनत्व वाढते. दूध आणि दुग्ध जन्य पदार्थ, मेथी, बदाम, रागी, शलजम, मासे, खजूर याचे सेवन केल्यास कॅल्शियमची कमी भरून निघते.

शिबिरात संधिवात, जॉईंट पेन, सूजन, अकड़न, लखवा, गठियावात, गाऊट, साइटिका, स्नायुचे दुखणे, कंपवात, ऑस्टियो आर्थराइटिस, कंबरदुखी, गुडघ्याचे दुखणे, ऑस्टियोपोरोसिस, स्पांडिलाइटिस, स्लिपडिस्क, पी.आय.डी, फ्रोजन शोल्डर, मस्क्यूलर डिस्ट्राॅफी, पोलियो, बाल पक्षाघात, एवैस्कुलर नेक्रोसिस आदी वात रोगाच्या तपासण्या करण्यात आल्या. शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. संचालन व आभार प्रदर्शन डाॅ. जी. एम. ममतानी यांनी केले.