आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही : जयंत पाटील

Jayant Patil

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी आमची शिफारस यादी राज्यपालांकडे (Governor) दिली असून यावर 15 दिवसांत निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती राज्यपालांना केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसंच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली . तसेच आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही असंही जयंत पाटलांनी (Jayant Patil) स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीकडून दिलेल्या यादीवर 15 दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा अशी विनंती महाविकास आघाडीने राज्यपालांना केली आहे. तर राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. पण प्रत्येकाला संधी देणं शक्य नाही. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणं स्वाभाविक आहे. पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू असंही यावेळी जयंत पाटलांनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER