महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरीश पटेल यांचे गुलाम; राष्ट्रवादी नेत्याचा आरोप

Anil Gote & Amrish Patel

नाशिक : धुळे-नंदूरबार विधानपरिषद निवडणुकीत अमरीश पटेल (Amrish Patel) यांचा विजय झाला आहे. ४३४ मतांपैकी ३३२ मतं अमरीश पटेल यांना तर काँग्रेसच्या अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली आहेत. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अमरीश पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजित पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान,अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले. यावरून महाविकास आघाडीत काहीही ठीकठाक नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

आता यावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी आघाडीच्या नेत्यांवर मोठा आरोप केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरीश पटेल यांचे गुलाम आहेत, असा घणाघाती आरोप गोटे यांनी केला आहे. आता त्यांच्या या आरोपावर आघाडीचे नेते कुठले स्पष्टीकरण देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजित पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती.

दरम्यान,अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले. भाजपच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ मतदारांनी मतदान केले होते. काँग्रेसच्या किमान ५७ मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना ९८ च मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे तर ४ मते बाद झाली आहेत. महाविकास आघाडीची २१३ मते असतानाही पाटील यांना ९८ च मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER