अनेक कायदे मोडलेत, तबलिघीनी मान्य केली चूक

Tablighi admitted the mistake

नवी दिल्ली :- कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीमध्ये झालेल्या मर्कजच्या कार्यक्रमामुळे कोरोनाची (Corona) साथ जास्त पसरल्याचा आरोप करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी देश-परदेशातील जमाती मोठ्या संख्येने जमले होते. दिल्लीच्या निझामुद्दीन येथील तबलिघी (Tablighi) जमातच्या मरकझ प्रकरणात साकेत कोर्टाने २७५ पेक्षा जास्त तबलिघी आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने परदेशी तबलिघी कार्यकर्त्यांना एक दिवस न्यायालयात (‘टिल रायजिंग कोर्ट’) उभे राहण्याची शिक्षा व ५ ते १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. आमच्याकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे व परदेशी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कालमांचाही आपल्याकडून भंग झाल्याचे त्यांनी मान्य केले. हे तबलिघी चीन, नेपाळ, इंडोनेशिया, फिजी आणि इतर देशातून दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते.

यापूर्वी, साकेत कोर्टानं बुधवारी ९१ परदेशी तबलिघी आरोपींना जामीन मंजूर केला होता. हे सर्व दिल्लीतील निझामुद्दीन मरकझमध्ये हजर होते. न्यायालयाने या सर्वांना प्रत्येकी १० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्याआधी साकेत कोर्टाने मंगळवारी याच प्रकरणाशी संबंधित १२५ परदेशी नागरिकांना जामीन दिला होता. दिल्ली पोलिसांनी मरकझ प्रकरणातील ९०० पेक्षा जास्त परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हिजा नियम आणि कोरोना दिशा-निर्देश धुडकावून लावत हे सर्व परदेशी नागरिक दिल्लीत जमले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER