एका शिक्षकाच्या व्यवसायामुळं अनेक भारतीय झाले गुलामीतून मुक्त!

Maharashtra Today

बंगालला १९२२ साली पुराचा मोठा झटका बसला होता. सारं काही उध्वस्त झालं होतं. लाखोंचं घरं वाहून गेली होती. संसार उघड्यव पडला होता. अनेकांवर भुखेनं मरायची वेळ आली होती. अशा परिस्थीतीत एक भारतीय केमिस्ट बंगालवासीयांसाठी आशेचा किरण बनून आला. बंगाल रिलीफ समिती स्थापून त्यांना तब्बल २५ लाख रुपये उभारले. त्यांचा या मदतीमुळं अनेकांचे जीव वाचले. त्या देवदुताचं नाव होतं आचार्य प्रफुल्ल राय. (charya Prafulla Rai)भारताच्या पहिल्या रसायन संशोधक संस्थेचे संस्थापक. त्यांना भारतातला केमिकस सायन्सचा (Chemics Science)जनक म्हणलं जातं.

२ ऑगस्ट १८७१ साली बंगालच्या खुलना जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. तिन भावंडांपैकी एक असणाऱ्या प्रफुल्ल यांचं प्राथमिक शिक्षण खेड्यातच झालं. ती शाळा त्यांचे आई वडीलच चालवायचे. १० व्या वर्षी प्रफुलचंद्र यांना शिक्षणासाठी कलकत्त्याला पाठवण्यात आलं. ते काही काळ तिथं राहीले. चौथीत असताना त्यांना गंभीर आजारानं ग्रासलं. त्यांना गावी परत आणण्यात आलं. गावी परतल्यानंतर त्यांना अत्यंत नैराश्य आलं ते दुर व्हावं म्हणून वाचण्यासाठी विज्ञान, भुगोल आणि बंगाल साहित्यिकांची पुस्तकं त्यांना देण्यात आली. त्यांची नजर चौकस बनली. सगळीकडचं त्यांना न्यान मिळालं.

१८७६ला ते परत कलकत्त्याला गेले. त्यांनी एल्बर्ट स्कुलमध्ये प्रवेश मिळाला. मॅट्रीक ते याच शाळेतून पास झाले. नंतर विद्यासागर कॉलेजमधून त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. विज्ञान शिकण्यासाठी त्यांनी प्रसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांच्या आयुष्याला वळण याच कॉलेजनं दिलं. कला आणि साहित्यात रमणाऱ्या प्रफुल्ल यांना विज्ञानात रुची निर्माण झाली.

तिथले लेक्चरर सर अॅलेक्झांडर पेडलर हे प्रफुल्ल यांची विद्वता बघून थक्क झाले. पेलडल यांनीच भारतात रसायन विज्ञान रुजवण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतला होता. या कॉलेजातून प्रफुल्ल यांना बी. एस.सी आणि एम. एस. सीची डिग्री मिळाली. त्यावेळी ऑरगॅनिक केमस्ट्री विषयात भारतात संशोधन जवळपास होतच नव्हतं. या विषयात प्रफुल्ल यांनी संशोधन केलं. यावर अनेक शोधपत्र त्यांनी प्रकाशित केले. रसायनशास्त्राच्या जगतात त्यांनी स्वतःच्या नावाचं प्रस्थ निर्माण केलं.

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना १८२२ ला शिष्यवृत्ती मिळाली. ते इंग्लंडच्या गिल्क्राइस्ट शिषवृत्तीच्या माध्यामातून इंग्लंडच्या एडीनबर्ग विद्यापीठात शिकायला गेले. इथूनच त्यांनी पुढची पदवी मिळवली. ऑर्नगेनिक केमस्ट्रीतील त्यांच्या संशोधनाला इंग्रजांनी डोक्यावर घेतलं. त्यांना मोठ्या पगाराची नोकरी तिथं मिळणार होती. पुढचं संपूर्ण आयुष्य ते सुखात जगु शकले असते पण त्यांनी भारतात परतायचा निर्णय घेतला. यानंतर एक वर्ष त्यांनी जगदिशचंद्र बोस यांच्यासोबत काम केलं.

कलकत्त्याच्या पेसिडेन्सी कॉलेडात ते असिस्टंत प्रोफेसर पदी रुजु झाले. इथं राहून त्यांनी विविध गोष्टींवर संशोधन केलं. मेघनाद साहा आणि शांती स्वरुप भटनागरसारखे महान वैज्ञानिक त्यांचे विद्यार्थी होते. राय नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करत. त्यांच्या लहानशा घरातच त्यांनी स्वतःची फार्मा कंपनी सुरु केली. ‘बंगाल केमिकल एँड फार्मासिटीकल वर्क्स लिमिटेड’ असं या कंपनीच नाव होतं. फक्त ७०० रुपयांच्या गुंतवणूकीतून त्यांनी ही कंपनी सुरु केली. भारतीय तरुणांच्या मनात उद्योजक व्हायची भावना निर्माण व्हावी म्हणून ते काम करत राहिले. स्वतदेशी कंपन्यांमधून भारतीय युवकांना रोजगार मिळावा अशी त्यांची यामागं भावना होती. इंग्रजांच्याच कंपनीत नोकऱ्यांचा शोध घेणं गरजेचा नाही. आपण स्वतः कंपनी उभा करु शकतो असा संदेश त्यांनी दिला.

स्वदेशी तंज्ञनाचा वापर करुन रसायन, औषधं आणि घरगुडी साहित्य बनवणारी ती पहिली कंपनी होती. यानंतर टुथपेस्ट, पाउडर, ग्लिसरीन, साबण इत्यादी बनवायला या कंपनीनं सुरुवात केली. खप ही वाढला. राय यांची कंपनी दिवसेंदिवस मोठी होत गेली.

यशस्वी व्यवसायिक ठरल्यानंतर राय यांना १९२० साली त्यांना ‘विज्ञान कॉंग्रेस’चं अध्यक्ष बनवण्यात आलं. राय साठ वर्षाचे झाले होते. विद्यापीठातला पुर्ण पगार त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या रसायन विभागाला देऊ केला. १९३६ साली वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांच्या मनात त्यांनी विज्ञानाबद्दल गोडी निर्माण केली. मार्गदर्शन केलं. त्यांच्या विद्यार्थ्यांनी भारताला स्वावलंबी बनवण्याचं ध्येय पुढं नेलं. १६ जून १९४४ साली त्यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

२०११ साली ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’नं राय यांना ‘केमिकल लँडमार्क प्लाक’ या सन्मानानं सन्मानित केलं. युरोपातच्या बाहेरील शास्ज्ञाचा क्वचितच सन्मान ही संस्था करते. भारतीयांसाठी ही गर्वाची बाब होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button