शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता

BJP-MVA

अहमदनगर : शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसमधील (Congress) अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्यात थोड्या दिवसात भाजपचे (BJP) सरकार येणार आहे, असा दावा भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत  आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या भेटीनंतर अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. कर्डिले यांनी हा दावा केल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

याबाबत शिवाजी कर्डिले म्हणाले की, भाजपची केंद्रात सत्ता आहेच, पण आता राज्यातही सत्ता येईल. राज्यात भाजपची सत्ता येणार असल्यामुळेच ते आमच्या संपर्कात आहेत. याशिवाय आगामी काळात नगरमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बरेच नगरसेवक आमच्यासोबत येतील, अशी प्रतिक्रिया शिवाजी कर्डिले यांनी दिली.

भाजप नगरसेवक मनोज कोतकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही कर्डिले यांनी प्रतिक्रिया दिली. कोतकर स्वत:च्या स्वार्थसाठी आणि पदासाठी राष्ट्रवादीत गेले असतील. त्याबाबत आमचे शहराध्यक्ष आणि महापौरांनी खुलासा केला आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची त्याबाबतचा निर्णय आमचे शहराध्यक्ष घेतील, असं कर्डीले यांनी सांगितलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER