राष्ट्रवादीत येण्यासाठी अनेकजण रांगेत! आज कॉंग्रेसच्या नेत्याने बांधले घड्याळ

NCP

मुंबई :- मागच्या वर्षी बरोबर याच दिवसांत राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी सोडून जात होते. राष्ट्रवादी आता पूर्ण खाली होणार, पवार कुटुंबापुरताच हा पक्ष शिल्लक राहणार, अशा मथळ्याच्या बातम्या माध्यमांतून येत होत्या. मात्र, अगदी एकाच वर्षात हे चित्र उलटे होताना दिसत आहे.

मागच्या वर्षीच्या तीन पक्षांच्या आघाडीने राजकारणातील अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. एकेकाळचे पक्के वैरी समजल्या जाणाऱ्या  पक्षासोबत घरोबा करून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय सूत्रे आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले आणि राष्ट्रवादी पुन्हा फुलायला लागली. आता राष्ट्रवादी पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक बहरेल असे चित्र आहे.

काल एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून मोठा राजकीय धक्का दिला. त्यानंतर आता आज कॉंग्रेसच्या नेत्याने हाताला राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे.

सिंधुदुर्गात राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसला धक्का दिलाय. कोकण काँग्रेसचे नेते तसंच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Kaka Kudalkar join NCP) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ  बांधलं. त्यानंतर आज काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER