अनेकांनी केले रेमोला सावळ्या रंगावरून ट्रोल

मुंबई : सिनेमात वर्णभेदाचा मुद्दा सर्वांसाठी काही नवीन नाही. उत्तम अभिनय येत असताना अनेक अभिनेते केवळ वर्णद्वेषामुळे वगळले गेले आहेत. अनेक कलाकारांनीही याबद्दल व्यक्त केले आहेत. आता प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D’Souza) यांनी आपले अनुभव सांगितले. केवळ सिनेसृष्टीच नाही, तर अगदी लहानपणापासून वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला आहे. हे अनुभव नुकताच मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

अनेकांनी रंगावरून कायम चिडवले, रंगावर भाष्यदेखील केले, पण त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचे ध्येय माझ्यात होते. आजही या देशात वर्णद्वेष केला जातो, हे सत्य असल्याचे रेमो यांनी सांगितले.

रेमो डिसूझाप्रमाणेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा, मलायका अरोरा, सोनम कपूर, हर्षदा खानविलकर यांसारख्या अनेक कलाकारांना वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे या वर्णभेदावर आधारित अनेक मालिका, चित्रपटांचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER