‘कित्येक कुटुंब कोरोनाबाधित, देवेन्द्रजी आता आपणच सरकारला मार्गदर्शन करा’

Devendra Fadnavis - Prakash Mehta - Maharastra Today

मुंबई :- कोरोनाने पुन्हा एकदा देशभरात थैमानन घालायला सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशा वेळी राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत माजी मंत्री प्रकाश मेहता (Prakash Mehta) यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून देवेंद्रजी आपणच शासनाला मार्गदर्शन करा, अशी विनंती केली आहे.

कोरोनाची भीषण परिस्थिती सुरु आहे. कित्येक जणांचं संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित आहे. कित्येकांची कुटुंबची कुटुंब रुग्णालयात आहेत. हे सगळं वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी विनंती फेसबुक पोस्ट लिहून प्रकाश मेहता यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केली आहे.

प्रकाश मेहता यांंनी फेसबुक पोस्ट…

“देवेंद्रजी सप्रेम नमस्कार… कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे. घाटकोपर मध्ये आज सर्वाधिक ३२७ रूग्ण पॉजिटिव निघाले आहेत. स्थानिक रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी जागा रिकाम्या नाहीत. परत पूर्ण लॉकडाऊन करायची वेळ येणार आहे की काय असे वाटू लागले आहे. आता तर कित्येकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असून एकाच रुग्णालयात उपचार घेताना आधळून येत आहेत”.

पती, पत्नी, मुलगा, सूनबाई एकाच रुग्णालयात पण वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे वेळीच थांबवण्यासाठी तुम्ही कृपया सकारात्मक मार्ग निघेल यासाठी शासनाला योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER