मुंबईत अनेक बांधकाम अवैध, मात्र कंगनावरील कारवाईला तपासण्याची गरज – शरद पवार

SHarad Pawar & Kangana Ranaut

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया व्यक्त करतानाच पवार यांनी कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेला कानपिचक्याही दिल्या आहेत.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कंगनाचं कार्यालय अधिकृत आहे की अनधिकृत हे मला माहीत नाही. मुंबई पालिकेचे स्वत:चे कायदे आहेत. त्यानुसार पालिका काम करते. मुंबईत बरीच बेकायदा बांधकामे आहेत. पण अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी पालिकेला कानपिचक्या दिल्या. तसेच अनावश्यकपणे ही कारवाई करून तिला बोलण्याची संधी मिळाली आहे. आता ही कारवाई का केली गेली हे तपासण्याची गरज आहे. असेही पवार म्हणाले.

पोलिसांनी केलेल्या कामांबद्दल राज्यातील लोकांना माहिती आहे असे सांगून पवार म्हणाले की, पाकिस्तान किंवा इतर कोणाशी तुलना करण्याकडे आपण फारसे लक्ष देऊ नये. माझी तक्रार माध्यमांकडे आहे. या मुद्द्याला अनावश्यकपणे महत्व देण्यात आले आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. असेही पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER