नगरमध्ये अनेक भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर :- संगमनेर आणि अकोले इथल्या भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरात‌ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (BJP workers enters in Congress at Ahmednagar in presence of Balasaheb Thorat) गेल्या काही काळात‌ लोक गेलेत.

त्यांची ‌वाट‌ चुकली, ते ‌परत‌ येत‌ आहेत. ‘सुबह का भूला शाम घर आये तो उसे भूला नहीं कहते’ असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक आजी-माजी आमदार, खासदारांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड पडले. आता हळूहळू स्थिती बदलते आहे. राष्ट्रवादीतही मेगाभरती सुरू आहे. आता काँग्रेसनेही आपली झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसला विरोधक लागत नाही ; निलेश राणेंचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER