राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार; भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधले घड्याळ

NCP - Maharashtra Today

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला २२ वा स्थापनादिन साजरा करत आहे. पक्षाने २२ वर्षे पूर्ण केल्याचा आनंद साजरा करत असताना राष्ट्रवादीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. आज लातूरमधील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने भाजपला मोठे खिंडार पाडले.

आज मुंबईच्या प्रदेश कार्यालयात स्थापनादिनाचा सोहळा साजरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूरचे माजी महापौर अख्तर मिस्त्री, भाजप युवा मोर्च्याचे घनश्याम सुरेश पवार व नगरसेवक राजा मणियार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच भाजपाचे बाबासाहेब गाडे पाटील व महाराष्ट्राचा महानायक विजेता मोहम्मद अयाज यांनीही यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. प्रदेश सचिव संजय शेटे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button