राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंगला सुरुवात ; भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर

many-bjp-leaders-may joins-ncp-maharashtra-politics .jpg

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडीला सुरुवात होत आहे . राष्ट्रवादीच्या (NCP) गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरूच आहे. यानंतर आता भाजपचे अनेक नेते हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रामधील भाजप नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे याच भागातून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यालयात शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar)आणि जयंत पाटील (Jyant Patil) यासह उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषत भाजपातील काही नेते यांना राष्ट्रवादी पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे.

जोपर्यंत भाजत नेते पक्षात प्रवेशाची अधिकृत घोषणा करत नाहीत तोपर्यंत इतर पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER