
मुंबई :- राज्यातील भाजपाचे अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असा दावा राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. यानंतर राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेले भाजपाचे हे बडे नेते कोण याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता विविध पक्षांच्या नेत्यांची घरवापसी सुरू झाली आहे. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहेत. काही दिवसांत मीरा-भाइंदरमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होणार, अशी चर्चा आहे.
मीरा-भाइंदरच्या माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते यांच्यासह शेकडो नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. काही कारणास्तव या नेत्यांनी राष्ट्रवादीला राम राम करून इतर पक्षात प्रवेश घेतला होता. आता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली मीरा-भाइंदरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता.
ही बातमी पण वाचा : भाजपच्या मोठ्या नेत्याची लवकरच राष्ट्रवादीत घरवापसी? पवारही इच्छुक
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला