क्वान एंटरटेनमेंटमध्ये अनेक कलाकारांची गुंतवणूक, सलमानचे आले नाव

Salman Khan

रिया चक्रवर्तीने ड्रग्स प्रकरणात विविध खुलासे केल्यानंतर क्वान KWAN एंटरटेनमेंट कंपनीचे नाव प्रामुख्याने पुढे येत आहे. या कंपनीत अनेक कलाकारांची गुंतवणूक असून अनेक कलाकारांसाठीही ही कंपनी काम करीत होती. ज्या दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे सांगितले जात ती दिशा सालियनही याच कंपनीत कामाला होती. एवढेच नव्हे तर या कंपनीचा एक संचालक अनिर्बान (Anirban) वर 2018 मध्ये बलात्कारचा आरोप करण्यात आला होता. मी टू प्रकरणात त्याचे नाव आले होते. एक-दोन नव्हे तर चार मुलींनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

रियाने माहिती दिल्याने आता ईडी क्वान एंटरटेनमेंटमध्ये कोणाकोणाची गुंतवणूक आहे त्याची चौकशी सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. याचे कारण सुशांतच्या अकाउंटमधून क्वान एंटरटेनमेंटला मोठी रक्कम ट्रांसफर करण्यात आली. आणि नंतर एक मोठी रक्कम रियाच्या अकाउंटला ट्रांसफर केल्याचे उघडकीस आले आहे. रियाच्या चौकशीत दीपिका पदुकोण (Deepika Padukon) ने क्वानच्याच करिश्‍मा नावाच्या मुलीकडे ड्रग्स मागितल्याचे समोर आले आहे. आता या कंपनीचे धागेदोरे सलमानपर्यंत पोहोचले आहेत. या कंपनीत सलमान खानने गुंतवणूक केल्याचे म्हटले जात आहे. परंतु सलमानच्या वकिलांनी या कंपनीत सलमानची थेट किंवा छुप्या पद्धतीने कोणतीही गुंतवणूक नसल्याचे स्पष्ट केले आहे. या कंपनीत एक प्रख्यात निर्माता मधु मंटेनाची गुंतवणूक आहे. मधु मंटेनाने आतापर्यंत ‘सुपर 30’, ‘उड़ता पंजाब’, ‘क्वीन’, ‘मसान’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

एकूणच आता बॉलिवुडमध्ये मोठ्या प्रमाणावर साफसफाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. अभिनेत्री रविना टंडननेही आता सफाई करण्याची वेळ आली असून हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. येणाऱ्या पिढीला आणि आपल्या मुलांना मदत येथूनच सुरु केली पाहिजे. हळूहळू दुसऱ्या क्षेत्रातील लोकही याविरोधात पुढे येतील असेही रविनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER