‘मनसुख हिरेन यांची हत्याच !’ नकळत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले मान्य?

Anil Deshmukh - Mansukh Hiren

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू आणि मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) घराबाहेरील स्फोटकं प्रकरणामुळे ठाकरे सरकार (Thackeray Government) मोठ्या अडचणीत सापडले आहे. माजी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. निलंबित एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मात्र परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांनी उत्तर दिले आहे.

मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे याचा सहभाग स्पष्ट होत असताना आणि त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना, परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं.

अनिल देशमुख यांनी हा परमबीर सिंग यांच्यावर पलटवार करताना जे ट्विट केलं आहे, त्यामध्ये त्यांनी मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचं मान्य केलं आहे. ट्विटमधील पहिल्या ओळीत अनिल देशमुखांनी “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी” असं लिहिलं आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांचा मृत्यू ही हत्याच होती, हे आता गृहमंत्र्यांनी मान्य केलंय का, असा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER