मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरण नवे वळण घेण्याची शक्यता

Mansukh Hiren

मुंबई : मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) घरासमोर स्फोटक सापडलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा काल (5 मार्च) संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांच्या चेहऱ्याजवळ, डोळ्यावर आणि पाठीवर जखमा असल्याची बाब शवविच्छेदन अहवालात उघड झाली आहे. पण या जखमा नेमक्या कधी झाल्या? याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शवविच्छेदन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मनसुख यांच्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या. तसेच त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी जखमा असल्याचे नमूद आहे. जर मनसुख यांनी आत्महत्या केली असेल तर एकाच बाजूला जखमा होणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही बाजूला झालेल्या जखमांमुळे संशयाचे गूढ वाढत चाललं आहे. पोलिसांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र पीएम रिपोर्टमध्ये याबाबतचा उल्लेख आहे. मनसुख यांच्या शरीरावर असलेल्या या जखमा एक सेंटिमीटरच्या आहेत. मनसुख यांचा मृतदेह 8 ते 10 तास पाण्यात पडून होता. त्यामुळे पाण्यातील काही जीवांमुळे या जखमा झाल्यात का याबद्दल खुलासा होणे बाकी आहे. या जखमा नेमक्या कधी झाल्यात हे यात नमूद होणे आवश्यक होते. मात्र त्यात हे नमूद करण्यात आलेले नाही.

ही बातमी पण वाचा : ‘एनआयए’कडेच तपास दिल्याने हिरेन मृत्यूप्रकरणाचे  सत्यबाहेर येणार नाही; राऊतांचे  विरोधकांना खडेबोल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER