मनसुख हिरेन पट्टीचे पोहणारे, नक्कीच घातपात झाला असणार; निकटवर्तीयांचा दावा

Mansukh-Hiren-Dead-body-recoverd

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. मनसुख हिरेन असं स्कॉर्पिओ मालकाचं नाव आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांनी कळवा खाडीत आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. मात्र हिरेन यांच्या निटकवर्तीयांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मनसुख हिरेन हे आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांना कुठलाही तणाव नव्हता. ते पट्टीचे पोहणारे होते ते पाण्यात आत्महत्या करू शकत नाहीत, असा दावा मनसुख हिरेन यांच्या निकटवर्तीयांनी केला.

मात्र मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी फेटाळून लावला. इतकंच नाही त्यांनी या घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, यामागे नक्कीच घातपात आहे. त्यांची हत्या झाली असावी हा आमचा आरोप आहे. त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच वर्गात शिकतात, जवळच्या सोसायटीत राहत असल्याने सतत भेट व्हायची. अंबानी स्फोटके प्रकरणात गाडी वापरल्यामुळे त्यांची मी विचारपूस केली होती. तर त्यांच्या बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून ते दबावात नव्हते हे स्पष्ट होतं. आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात एक निष्पाप बळी गेलाय, असेही त्या निकटवर्तीयाने सांगितले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन हे काल रात्री सव्वा आठच्या सुमारास घराबाहेर पडले आणि मग ते घरी परतलेच नाही. ते पायी घराबाहेर गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान एक ऑडिओ क्लिप हिरेन यांच्या मुलाची व्हायरल होते आहे. त्यानुसार हिरेन यांना पोहता येत होतं आणि ते आत्महत्या करण्याची शक्यताही कमी असल्याचही मुलगा म्हणतो. मित हिरेन असं मुलाचं नाव आहे. हा घातपात असावा असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER