सचिन वाझेचा साथीदार; शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडेची अटक अटळ

dhananjay gawde - arrested - Maharastra Today

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणावरून चांगलेच राजकारण सुरू आहे. या प्रकरणी सचिन वाझेला अटक झाली. नालासोपाऱ्यातील शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक धनंजय गावडे (Dhananjay Gawde) याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. येत्या १५ दिवसांत धनंजय गावडेने पोलिसांसमोर हजर व्हावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे गावडेला लवकरच अटक केली जाईल, अशी चर्चा आहे. याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे.

धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसांत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. खंडणीसह अनेक गुन्हे असलेला आणि सचिन वाझेचा साथीदार असलेल्या गावडेची अटक आता अटळ आहे, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

बेकायदा बांधकामांना लक्ष्य करून धनंजय गावडेने वसई-विरार भागातील बिल्डरमध्ये दहशत निर्माण केली होती. गावडेविरोधात ठाण्यात खंडणी, बलात्कार, फसवणूक असे आठ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी जामीन मिळावी, यासाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गावडेवर असलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

कोण आहे गावडे?
धनंजय गावडे हा वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचा माजी नगरसेवक होता. तो पालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुखही होता. गावडे २०१५ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ६३ मधून नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आला. मात्र, बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्याच्यावर आरोप झाला. आचोळे येथील २६ गुंठे जमीन खरेदीप्रकरणी त्याच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २०१७ मध्ये शिवसेनेतून गावडेची हकालपट्टी केली.

बलात्कार, फसवणूक, खंडणीचा आरोप
धनंजय गावडे याच्यावर फसवणूक, खंडणी आणि बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २०१८ मध्ये एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार होती. काही बिल्डरांनी त्याच्यावर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. भाइंदर येथील एका विकासकामाकडून २० लाख रुपयांची खंडणी केल्याचाही आरोप आहे. तसेच २०१६मध्ये आयकर विभाग आणि ईडीने त्याच्या घरी धाडी मारली आहे. त्याच्याकडून ४० लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. ही रक्कम ईडीला गावडेच्या गाडीत मिळाली होती. धनंजय गावडेवर एकूण नऊ एफआयआर दाखल आहेत.

एकूण नऊ FIR
धनंजय गावडेवर एकूण नऊ एफआयआर दाखल करण्यात आले. यात बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. हे एफआयआर २०१५ ते २०१८ दरम्यान दाखल करण्यात आले. धनंजय याने बिल्डरांना धमकी दिली की, बांधलेल्या इमारती महापालिकेच्या प्लानिंगनुसार नाहीत. त्या तोडल्या जाऊ शकतात. माहितीच्या अधिकाराखाली त्याने ही माहिती काढल्याचे गावडेने सांगितले आणि पैशांची मागणी केली. ५०० हून अधिक प्रकरणाची धनंजय आणि त्याच्या साथीदाराने माहिती मागवली आणि त्या आधारे लोकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button