शवविच्छेदन अहवाल : मनसुख हिरेन यांच्या शरीरावर मोठ्या जखमा नाहीत

Mansukh Hiren

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काल मुंब्य्रात सापडला. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या शवविच्छेदन अहवालात मृतदेह सापडल्याच्या १२ ते २४ तास आधी त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमा नाहीत. परंतु अहवालात मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच कोणत्याही घातपाताचा उल्लेख या शवविच्छेदन अहवालात नाही.

त्यांच्या कोणत्याही अवयवाला दुखापत झालेली नाही, असंही शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. मृत्यूचं नेमकं कारण हे केमिकल ॲनासिसिसनंतर समोर येणार आहे. त्यांचा मृत्यू बुडून झाला की हा घातपात हे केमिकल ॲनासिसिसमधून स्पष्ट होईल. मनसुख हिरेन यांच्या चेहऱ्यावरील जखमांवरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं प्राथमिक कारण समोर येईल अशी अपेक्षा होती. परंतु अहवालात मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालाशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मनसुख हिरेन यांच्या कुटुंबांने घेतली होती. त्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे शवविच्छेदन अहवाल घेऊन त्यांच्या घरी पोहचले. पोलिसांनी दिलेल्या अहवालावर हिरेन यांचे कुटुंबीय समाधानी नसल्याचे यावेळी जैन समाजाच्यावतीने सांगण्यात आलं. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप यावेळी हिरेन यांच्या नातेवाइकांनी केला. तसेच जोपर्यंत मृत्यूचे कारण समजणार नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नसल्याचं यावेळी नातेवाईक आणि मित्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

ही बातमी पण वाचा : …आता मनसुख हिरेन, निष्पक्ष चौकशी होईल ना?; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER