मनसुख हिरेन मृत्युप्रकरण : सुनील माने याची १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

Sunil Mane - Mansukh Hiren

मुंबई : ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचा निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने (Sunil Mane) याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सुनील मानेला १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच माने याच्या कुटुंबाने त्याच्या जीवितास धोका असल्याचा दावा केल्यानंतर न्यायालयाने सुनील माने याला कारागृहात सुरक्षा पुरवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.

ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने याला मागच्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आले होते. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सुनील माने याच्या नातेवाइकांनी सुनील माने हे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या कर्तव्यादरम्यान अनेक गुंडांवर कारवाई केली आहे. त्यामुळे कारागृहात गेल्यावर गुंडांकडून धोका असल्याचा दावा केला. त्यानंतर ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर सुनीलला कोठडीमध्ये संरक्षण द्यावं, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button