‘आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ जवळ आली’, सचिन वाझेंच्या स्टेटसमुळे खळबळ

Sachin Waze

मुंबई :- मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren case) प्रकरणात संशयाच्या जाळ्यात अडकलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची काल बदली झाल्यानंतर त्यांच्या आजच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. ‘जगाला आता गुडबाय म्हणण्याची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) (Citizen Facilitation Center) बदली करण्याचे आदेश निघाले होते.

३ मार्च २००४ रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला एका खोट्या प्रकरणात अटक केली होती. मला केलेली ही अटक आजपर्यंत अयोग्य आहे. या इतिहासाची मला आता पुन्हा जाणीव करुन देत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी कट रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची १७ वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची १७ वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER