
कोरोनाची (Corona) लाट जशी ओसरत चालली आहेत तसे ज्यांचे लग्न ठरले होते त्यांनी आता बोहल्यावर चढण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये सेलिब्रिटी जोडप्याचाही समावेश आहे. अनलॉक कधी होतं आणि आपण एकमेकांच्या गळ्यात हार कधी घालतोय याची ते वाट बघत होते. आणि या पंक्तीमध्ये अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हीदेखील होती. त्यामुळे लवकरच आता मानसी नाईक तिचा प्रियकर प्रदीप याच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. जसा सध्या प्री वेडिंग शूटिंगचा ट्रेंड आहे तसाच बॅचलर पार्टीचा देखील ट्रेंड जोरात आहे. ही संधी मानसी नाईक सोडेल असे शक्यच नव्हतं. त्यामुळे सध्या ती तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी करण्यात रंगून गेली आहे.
मुंबईमध्ये तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलर पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांनी ड्रेस कलर थीमपासून ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि धम्माल मस्ती करत बॅचलर पार्टी साजरी केली. मानसीने या पार्टीचे फोटो अर्थातच सोशल मीडियापेजवर शेअर केले आहेत. चाहत्यांनी या फोटोला कमेंट करण्याबरोबर मानसीला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.१९ जानेवारीला मानसी तिचा प्रियकर प्रदीप याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे तिचे काउंटडाऊन सुरु झाले आहे.
अभिनय, नृत्य, जाहिरात, मॉडेलिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मानसी नाईक हिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून मानसी नाईकने तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या जाहीर कार्यक्रमात तिला डान्सच्या ऑफर येऊ लागल्या. मानसीचा डान्स पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच आतुर असतात. ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोमध्ये मानसीच्या नृत्याची जादू तिच्या चाहत्यांनी अनुभवली होती. महेश टिळेकर यांच्या मराठी तारका या कार्यक्रमात देखील मानसी नाईक हिने तिच्या नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.
काही महिन्यापूर्वीच मानसी आणि प्रदीप यांचा साखरपुडा झाला होता. त्या साखरपुड्याचे फोटो मानसीने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. प्रदीप खरेरा आणि मानसी यांची बऱ्याच दिवसांपासून ओळख आहे. प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर असून त्याने काही जाहिरातीतही काम केले आहे. तो प्रेमाने मानसीला लाडोराणी असं म्हणतो, यावरूनदेखील मानसीच्या सोशल मीडिया अकाउंट वर चर्चा रंगली होती. मानसीने काही सिनेमातही काम केले आहे मात्र सध्या मानसी अभिनेत्रीपेक्षा उत्तम डान्सर म्हणून लोकप्रिय आहे.
मानसीने डान्स केलेली, बघतोय रिक्षावाला , मस्त चाललय आमचं ही गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. लग्न होण्यापूर्वी मित्रमैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी करण्याची क्रेझ सेलिब्रेटीमध्ये वाढत आहे. गेल्या तीन चार महिन्यांमध्ये अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर यांनी देखील लग्नापूर्वी मैत्रिणींसोबत केलेल्या बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केले होते. या निमित्ताने आपल्या सेलिब्रिटी मैत्रिणीला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या, त्यानंतर खूप सारी धमाल करायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेज लाईफमध्ये मित्रमैत्रिणी मिळून ज्या प्रकारे धमाल मस्ती करतो ते आयुष्य पुन्हा जगून घ्यायचे अशी या मागची संकल्पना आहे. मानसीच्या मैत्रिणींनीही यासाठीच तिच्यासाठी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत मानसीने एक खास केक कापून तिच्या नव्या आयुष्यातील स्पेशल गोष्टी मैत्रिणींशी शेअर केल्या.या बॅचलर पार्टीत अर्थातच मानसीचा होणारा नवरा प्रदीपला एन्ट्री नव्हती. खूप धमाल असूनही मानसी प्रदीपला या पार्टीत मिस करत होती.
View this post on Instagram
View this post on Instagram
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला