जीसी मुर्मू यांचा राजीनामा मंजूर ; जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा

Manoj Sinha-GC Murmu

श्रीनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते मनोज सिन्हा (Manoj Sinha) आता जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल असतील. गिरीशचंद्र मुर्मू (GC Murmu) यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मनोज सिन्हा यांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपती भवनातर्फे करण्यात आली आहे.

5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आहे, दरम्यान बुधवारी संध्याकाळी जीसी मुर्मू यांच्या राजीनाम्याची अचानक बातमी समोर आली. मुर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. आता नव्या एलजीची जबाबदारी मनोज सिन्हा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER