फार गंभीर चर्चा झाली नाही, पण काही प्रश्न बोलण्याच्या ओघात येतात ; गडकरींच्या भेटीनंतर मनोहर जोशींची प्रतिक्रिया

Manohar joshi-nitin gadkari

मुंबई :  केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkri)यांनी नुकतीच, गुरुवारी 7 जानेवारीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीने त्यांच्यातील ऋणानुबंध कायम असल्याचं दाखवलं. या भेटीनंतर मनोहर जोशी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते देखील दिलखालासपणे या भेटीवर बोलले.

“नितीन गडकरी घरी आल्याचा आनंद झाला. गडकरींनी स्वतःहून भेटीसाठी येत असल्याचं सांगितलं. त्यांच्याबाबत मला संपूर्ण माहिती आहे. ते स्पष्टवक्ते आहेत”, असं मनोहर जोशी म्हणाले.

जोशी – गडकरी भेटीवर माध्यमांध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चा झाली. या भेटीबद्दल बोलताना जोशी म्हणाले, माझ्या मुलाची नितीन गडकरींशी चांगली मैत्री आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये जास्त गप्पा झाल्या. फार गंभीर चर्चा झाली नाही. पण काही प्रश्न बोलण्याच्या ओघात येतात. माझ्या नातवाशी गडकरींनी गप्पा मारल्या. थोडी चर्चा झाली पण चांगली चर्चा झाली, असं त्यांनी नमूद केलं.

ही भेट कशी घडली –

तसेच, मनोहर जोशी यांनी ही भेट घडून कशी आली याबाबत सांगताना ते म्हणाले, “गडकरींनी स्वतःहून सांगितलं मी भेटण्यासाठी येतोय. मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. मी घरी गेलो. नितीन गडकरींची मला माहिती पूर्ण आहे. त्यांनी माझ्या नातवाशी चर्चा केली. गडकरी घरी आल्याचा आनंद झाला. त्यांचे मुख्य वैशिष्टय आहे स्पष्टवक्तेपणा. यामुळे राजकारणात अनेकदा नुकसानही होते. पण त्याची पर्वा न करता गडकरी त्यांच्या मनात जे आहे ते बोलतात. ते बराच वेळ माझ्या घरी बसले होते. आमच्या चांगल्या गप्पा झाल्या. मग ते गेले. ती राजकीय भेट नव्हती. सामाजिक भेट म्हणाल तर जरूर होती”.

नितीन गडकरींनी बांधलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून गेल्यानंतर आज सर्वजणच धन्यवाद देतात, असंही मनोहर जोशींनी सांगितलं.

बरेच दिवस आम्ही भेटलो नव्हतो. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही भेटलो. आताच्या मंत्रिमंडळातील माझे सर्वात आवडते मंत्री आहेत, असं जोशी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER