पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

PM Modi-Manmohan Singh

मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचा आज वाढदिवस आहे. सिंग यांनी आज वयाच्या ८८ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीसुद्धा मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी, दीर्घायुष्य लाभो.’ – असे पंतप्रधान मोदींनी  शुभेच्छा संदेशाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यासोबतच मनमोहन सिंग यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनमोहन सिंग यांचा जन्म भारताच्या फाळणीआधी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. २००४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मनमोहन सिंग १९९८ ते २००४ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी होते. २००४ ते २०१४ या कार्यकाळात मनमोहन सिंग पंतप्रधानपदी विराजमान होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER