काँग्रेसच्या पराभवाला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी जबाबदार? प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून अनेक गुप्त गोष्टी येतील बाहेर

Pranab Mukhrjee & Congress Leaders

नवी दिल्ली : मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आतल्या आत कॉंग्रेस पोखरत जात होती. भाजपने निवडणूक  जिंकण्यासाठी युद्धस्तरावर ग्राउंडलेवलवर काम केव्हाच सुरू केले होते. केंद्रात मोदींच्या प्रचाराची अशी काही जादू चालली की, केंद्रात भाजप बहुमताने सत्तेवर आली.  एवढेच नाही तर, राज्याराज्यांतही भाजपने आपले वर्चस्व गाजवले व देशभरात भाजपची लाट आली. मात्र, त्यानंतर सर्वच राज्यांत कॉंग्रेस नेस्तनाबूत होण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रात तर कॉंग्रेसला एकाच खासदारावर समाधान मानावे लागले. संपूर्ण देशभरात इतकी वर्षे सत्ता गाजवणारी कॉंग्रेस इतकी का गळून पडली, हा राजकीय तज्ज्ञांचा महत्त्वाचा विषय बनला.

एवढेच नाही तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Dr. Manmohan Singh) आणि काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) जबाबदार होत्या का? काँग्रेसच्या सद्य:स्थितीला कोण जबाबदार? असा प्रश्न अनेकांच्या ओठांवर येता येता राहिला. मात्र, आता कॉंग्रेसचेच दिवंगत नेते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून मोठा खुलासा करण्यात आला आहे.  प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांनी लिहिलेलं पुस्तक ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ (The Presidential Years) लवकरच प्रकाशित होणार आहे. मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि पंतप्रधानपद न मिळवू शकलेले नेते होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमधील अनेक गुप्त गोष्टी पुस्तकात लिहिल्या असतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सोनिया गांधी यांनी आपल्याला संधी न दिल्याची सल त्यांच्या मनात कायम होती. The Presidential Years नावाचे हे पुस्तक जानेवारीमध्ये बाजारात येणार असून यामध्ये अनेक खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी यांच्या मनात कायम पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा होती. २००४ साली त्यांच्याकडे संधीदेखील होती. परंतु सोनिया गांधी यांनी आपल्याला संधी न दिल्याची सल त्यांच्या मनात कायम राहिली. आपल्यापेक्षा कमी राजकीय अनुभव असलेल्या पंतप्रधानाला आपल्याला रिपोर्ट करावे लागत असल्याची भावना त्यांच्या मनात होती. मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळातील वादाच्या बातम्या अनेकदा बाहेर आल्या आहेत.

अनेक खासदारांचा आणि नेत्यांचा प्रणव मुखर्जींना पाठिंबा

अनेक घोटाळ्यामध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांचे नाव आल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रतिमा खराब होत होती. परंतु तरीदेखील पंतप्रधान न बदलता काँग्रेसने चुकी केली का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत होता. प्रणव मुखर्जी यांनी या पुस्तकात लिहिले, ‘काँग्रेसच्या काही सदस्यांनी असा अंदाज व्यक्त केला होता की, जर मी सन २००४ मध्ये पंतप्रधान झालो असतो, तर सन २०१४ मध्ये कदाचित काँग्रेसचा इतका मोठा पराभव झाला नसता. मात्र मी हा विचार स्वीकारत नाही,  मी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने राजकीय भान हरवले असे मी मानतो. सोनिया गांधी या पक्षातील प्रकरणे सांभाळण्यात असमर्थ होत्या, तर डॉ. सिंग दीर्घकाळ लोकसभेत उपस्थितच नसायचे.  त्यामुळे त्यांचा इतर खासदारांशी व्यक्तिगत संपर्क संपुष्टात आला होता.’

२०१४ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला नसता

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा काँग्रेसला मोठा फटका बसला. सरकारने आंदोलनकर्त्यांशी चर्चेचा निर्णय घेतला; परंतु प्रणव मुखर्जींना तो मान्य नव्हता. पण इतर नेत्यांच्या दबावामुळे त्यांना आंदोलनकर्त्यांशी बोलणी करावी लागली. त्याचबरोबर काँगेसची  प्रतिमा खराब होत असताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना कुणीही पंतप्रधान बदलण्याचादेखील सल्ला दिला नाही. त्याचबरोबर सोनिया गांधी यांना कुणी तसे सुचवल्यास त्या याला विरोध करत. त्यामुळे २०१४ मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे जे काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याचा सल्ला सोनिया गांधींना देत होते त्यांचा अंदाज बरोबर होता हेच काँग्रेसच्या पराभवानंतर सिद्ध झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER