भुजबळांना मोठा धक्का, खंद्या समर्थकाकडून शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर

Chhagan Bhujbal

नाशिक : ऐन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. भुजबळ यांचे खंदे समर्थक माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माणिकराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संभाजी पवार यांना पाठिंबा जाहीर केला.

ही बातमी पण वाचा:- शिवसेनेेचे खासदार धैर्यशील मानेंनी भर पावसात गाजवली प्रचार सभा

विशेष म्हणजे शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, माजी आमदार कल्याणराव पाटील हेही उपस्थित होते. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भुजबळांविरोधात रणशिंग फुंकले आहे. ते स्वतः भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये ३ जाहीरसभांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भुजबळांसमोर मोठं आव्हान असणार आहे.