अनेक अविष्कार घडवणारे मणिकफन आहेत सातवी पास, १४ भाषांचं आहे ज्ञान !

Maharashtra Today

वर्ष १९८१ अनेक अर्थान स्मरणात आहेत. याच वर्ष महान अभिनेत्री नरगिस दत्त यांनी शेवटचा श्वास घेतला. रोनाल्ड रिगन यांनी अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष बनले. आणि पुण्यात ‘इन्फोयसीस’ कंपनीची स्थापना झाली. या सर्वातच लक्षदिप मधल्या सर्वात दक्षिणेकडील बेट ‘मिनीकॉय’मध्ये ‘अलि मणिकफन’ (Ali Manikfan) शांत वातावरणात एका आयरिश नाविकच्या ‘टीम सेविरन’ (Team Seviran) नावच्या व्यक्तीची वाट पाहत होते. ते ओमानच्या यात्रेवर निघणार होते.

मणिकफन यांच्यासाठी त्यावर्षीच मोठं काम होणं बाकी होतं. या टीम यांच्यासह त्यांच्यावर जबाबदारी होती ‘सोहर जहाज’ बांधणीचं. सिंदबादच्या जहाजा प्रमाणं त्यांना जहाज बनवायचं होतं.या टीम यांचं मिनिकॉय बेटावर स्वागत झालं. मिनिकॉयची ओळख त्यांच्या नाविकांसाठी होती. मध्ययुगातल्या अरबांची जहाज बांधण्यासाठी लागणारी मोठी रस्सी इथूनच पुरवली जायची. पुढच्या काही दिवसात दोघांनी एकत्र नारळाच्या जटा एकत्र करण्यात घालवले. ज्यातून गुणवत्ता असलेल्या नारळाच्या भुशाला हातावर रोल करण्यात आलं. त्यांनी आइनी नावाचं लाकड उपलब्ध केलं ज्याच्या उपयोग प्रसिद्ध ‘स्नेक बोट’ बनवण्यासाठी केला जातो.

टिम यांना काम प्रभावी पद्धतीनं काम करण्यासाठी एका सुपर वायजरची आवश्यक्ता होती. तेव्हा सेंट्रल मरीश फिरशीज रिसर्च इन्सटीट्यूट (सी.एम.एफ.आर.आय.)चे समुद्रातल्या जीव विज्ञानाचे अभ्यास करणारे डॉ. संथप्पन जोन्स यांनी टीमला मणिकफन यांच नाव सुचवलं. टीमसाठी हा मोठा आश्चर्याचा धक्का होता. प्राथमिक शिक्षण पुर्ण न केलेला व्यक्ती आयरलँडच्या एका नाविक तुकडीचं नेतृत्त्व करणार होता.

लाकुड आणि नारळाच्या जटाच्या वापरातून पारंपारिक ८० फुट लांब आणि २२ फुट रुंद जहाज बनवण्यासाठी, टीम आणि मणिकफन ३० सुतारांसह मस्कतला पोहचले. त्यांनी वर्षभर चोवीस तास काम केलं. लाकडाच्या पट्ट्या कापल्या, धातूच्या जागी लाकडाचा वापर करण्यात आला. या जहाजाचं नाव ‘सोहरन’ ठेवण्यात आलं जे ओमानमधील एक शहर आहे. या जहाजातून ओमान ते चीन असा ९ हजार ६०० किलोमीटरचा समुद्री प्रवास टीम यांनी पुर्ण केला. यात्रेच्या नंतर हे जहाज ‘ओमानच्या राष्ट्रीय संग्रहालयात’ ठेवण्यात आलं.

मणिकफन यांच्या सारखा गुणी आणि ज्ञानी व्यक्ती ८२ व्या वर्षी केरळच्या कोडिकोडा जिल्ह्यातल्या ओलवन्नामध्ये साध्या राहणीत जगत आहेत. याआधी त्यांचे पुर्वज या गावी रहायचे. मणिकफन पुर्णपणे आत्मनिर्भर आहेत. ते स्वतः शेती करुन स्वतःपुरते पिक पिकवतात. मासेमारी करतात. सौर्यउर्जेतून वीजेच उत्पन्न करतात.

शेजाऱ्यांसाठी मणिकफन आजोबांसारखे आहेत. त्यांनी (सी.एम.एफ.आऱ.आय.) मधून निवृत्ती घेतल्यानंतर ओलवन्नात सुखी आणि आनंदी जीवन जगत आहेत. जेव्हा त्यांच्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांना टीव्हीवर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या वर्षी जानेवारीत त्यांना ‘ग्रासरुट इनोव्हेशन’साठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

मणिकफन यांना पुरस्कार आणि सन्मानाची आवड नाहीये. पुरस्कार स्वीकारताना संकोच होत असल्याचं ते अनेकदा मुलाखतीत सांगतात. विनम्र आणि मितभाषी स्वभावाचे मणिकफन वेगवेगळ्या क्षेत्रात जसं की जहाज निर्मती, समुद्र विषयक संशोधन, भुगोल, खगोल विज्ञान, मत्स्य पालन, कृषी आणि शास्वत उद्योगाविषयी अभ्यास त्यांनी केलाय. फक्त सातवी पर्यंत त्यांच शिक्षण झालं असलं तरी त्यांनी अनेक भाषा आत्मसात केल्यात त्यांना इंग्रजी, हिंदी, मल्ल्याळम, अरबी, लॅटीन, फ्रेंच, रशियन, जर्मन, सिंहली, पारशी, संस्कृत, तमिळ अशा १४ भाषा बोलता (Manikphan is the seventh pass, knowledge of 14 languages)येतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button